आदित्य ठाकरेंनी पुन्हा करून दिली मुख्यमंत्र्यांना चॅलेंजची आठवण; म्हणाले, होऊन जाऊ द्या...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच दुसरीकडे निवडणूक अयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह दिल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वाद वाढतच चालला आहे. हाच आरोप- प्रत्यारोप सुरु असताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काही दिवसापूर्वी दिलेल्या चँलेंजची आठवण करून दिली. वरळी येथे आयोजित निर्धार मेळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरेंनी ही टीका केली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वरळीत घेतलेल्या सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे जुने चँलेंज मुख्यमंत्र्यांना आठवून दिले. यावेळी ते म्हणाले की, त्या दिवशी मी त्यांना चँलेंज दिले. मी त्यांना सांगितलं मी साधा आमदार मी काय करणार तुम्हाला? तरीही माझ्या मतदार संघात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाच पाच मंत्री येतात. चला तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजनीमा द्या आणि वरळीत लढा. पण ते म्हणाले आम्हाला आणखी मोठं चॅलेंज द्या. आम्ही संघर्षामधून उभे राहिलेलो लोक आहोत. कसला संघर्ष तुम्ही ज्या ठाण्यातुन आलात जो ठाणे शिवसेनेचा शिवसेनेचा ठाणे संघर्ष नव्हता लोकांनी शिवसैनिक म्ह्णून निवडून दिले. संघर्ष आम्ही करतो उद्धव साहेब ४० वार घेऊन तुमच्याशी संघर्ष करता. केंद्रीय यंत्रणा घेऊन संघर्ष करता. मला राजकारणातून बाहेर करण्याचं चालू आहे. पण त्या आधी आणखी एक चॅलेंज पुन्हा देतो. वरळीतून लढण्याचे चँलेंज दिले होते. तेव्हा त्यांना माझं डिपॉझिट जमा होईल यांची काळजी होती. पण मी त्यांना म्हणतो. वरळीतून नाही तर मी तुमच्या इकडे येऊन निवडणूक लढतो. मी आमदारकीच राजीनामा देतो तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. आणि ठाण्यात निवडणूक लढतो होऊन जाऊ द्या एकदा. असं आव्हान त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, सत्तेवर गद्दार बसलेले आहेत. चोर बसलेले आहेत. बापचोर बसलेले आहेत. अलिबाबा बसलेले आहेत. अलिबाबा आणि ४० चोर हा आकडा बरोबर झालेला आहे. सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत. हे अल्पायुषी सरकार आहे. हे सरकार कोसळणारच आहे. हे थोड्या दिवसांचे सरकार आहे. त्यांच्या-त्यांच्यातच भांडणं लागली आहेत. असे देखील विधान त्यांनी यावेळी केली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील वरळीत सभा झाली होती. त्यावेळी त्या सभेची गर्दीवरून प्रचंड चर्चा झाली होती. त्या ठिकाणी सभे दरम्यान अनेक खुर्च्या रिकामी दिसत होत्या. याच रिकाम्या खुर्च्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले आहे. गद्दार लोकांनी नाव चोरले. चिन्हे चोरले. पण या खुर्च्या चोरू शकत नाही. माध्यमांना आवाहन करत ते म्हणाले, त्यांची खुर्च्यांची गर्दी दाखवली, आता ही शिवसैनिकांची गर्दी दाखवा. असे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.