'शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यात आहे का, गौतमी पाटील तुमची बहीण नाही का?'

'शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यात आहे का, गौतमी पाटील तुमची बहीण नाही का?'

ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

वसीम अत्तर | सोलापूर : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून सध्या राजकारण चांगलंच तापल्याचे दिसून येत आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी मत व्यक्त केले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यामध्ये आहे का? गौतमी पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल झाला ती तुमची बहीण नाही का, असा प्रश्न कोळी यांनी विचारला आहे.

'शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यात आहे का, गौतमी पाटील तुमची बहीण नाही का?'
राज्यपालांचे 'तो' निर्णय ठाकरे सरकार पाडण्याचं पाऊल; सुप्रीम कोर्टाचे कोश्यारींच्या भूमिकेवर ताशेरे

गौतमी पाटील यांचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. मग ती तुमची बहीण नाही का? शीतल म्हात्रेंसाठी तुम्ही विधानसभा बंद पाडली. मग या भगिनी नाहीत का? यांना इज्जत नाही का? इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का? याचा अर्थ तुम्ही पक्षापात करत आहात. तुम्ही कायद्याचा गैरवापर करून सर्वासामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहात, असे मत शरद कोळी यांनी व्यक्त केले.

गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओची एसआयटी चौकशी करा. बार्शीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्या आरोपींवर कारवाई करा. माजी भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात फेसबुकवर रोज एक महिला अत्याचार केलेची तक्रार करत आहे. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी देखील शरद कोळी यांनी केली.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यामध्ये आहे का? अन्य महिलांवरती अत्याचार होतात त्यावरती राज्य सरकार का लक्ष देत नाही? बार्शी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. त्याची पोलिसांनी दखल घेतली नाही. आरोपींनी पोलिसात का तक्रार दिले म्हणून पीडितेची बोटं छाटली. त्याचीही चौकशी करा, असेही शरद कोळी यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com