मी एकटा सत्ताधाऱ्यांना पुरुन उरलोय; उध्दव ठाकरेंना खंबीर साथ देणारे कोण आहेत वैभव नाईक?

मी एकटा सत्ताधाऱ्यांना पुरुन उरलोय; उध्दव ठाकरेंना खंबीर साथ देणारे कोण आहेत वैभव नाईक?

ठाकरे-राणे वादापेक्षा नाईक-राणे हा वाद टोकाचा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांची काहीच दिवसांपुर्वी एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. यामुळे वैभव नाईक नाराज असून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच, त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. यामुळे शिंदे गटाच्या हातात आयते कोलीत दिल्याचे बोलले जात होते. परंतु, वैभव नाईक यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. सिंधुदुर्गामध्ये मी एकटा सत्ताधाऱ्यांना पुरुन उरलोय. मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी शिवसेना सोडणार नाही, असे नाईकांनी ठासून सांगितले आहे. हे वैभव नाईक आहेत तरी कोण?

मी एकटा सत्ताधाऱ्यांना पुरुन उरलोय; उध्दव ठाकरेंना खंबीर साथ देणारे कोण आहेत वैभव नाईक?
पाण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण; अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

कोकणातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून सहा आमदारांपैकी योगेश कदम, उदय सामंत आणि दीपक केसरकर हे तिघेजण शिंदे गटामध्ये सहभागी झाले आहेत. पण वैभव नाईक ज्येष्ठ आमदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेच्या सभांचं आयोजन देखील वैभव नाईक यांनी केलं होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी वैभव नाईक यांना रत्नागिरी एसीबीनं चौकशीसाठी नोटीस दिली होती. एवढेच नव्हेतर त्यांच्या आमदार निधीतून आर्थिक सहाय्य मिळालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांनाही नोटीस बजावून रत्नागिरीतील कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. ग्रामपंचायतींच्या सरपंचांना नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ होती.

याशिवाय वैभव नाईक हे नारायण राणे यांचे पारंपारिक विरोधक मानले जातात. ठाकरे-राणे वादापेक्षा नाईक-राणे हा वाद टोकाचा आहे. सिंधुदुर्गातील रमेश गोवेकर, अंकुश राणे, श्रीधर नाईक आणि सत्यविजय भिसे यांच्यापैकी काही जणांच्या हत्या झाल्या तर काही जण अचानक बेपत्ता झाले. नाईक आणि भिसे यांच्या हत्येत नारायण राणेंचा हात आहे, असा गंभीर आरोप राणेंवर झाला होता. राणेंना अटकही करण्यात आली होती. पण, यापैकी कुठलाही गुन्हा राणेंविरोधात सिद्ध होऊ शकला नाही. मात्र, २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंना हार पत्करावी लागली आणि त्यांना मात देणारे होते श्रीधर नाईक ह्यांचे पुतणे वैभव नाईक हेच होते. अशातच, आता येत्या दोन महिन्यात नारायण राणेंच मंत्रिपद जाणार आहे, असा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com