भूषण देसाई शिंदे गटात जाणार? ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, वडिलांच्या मंत्रिमंडळाचा फायदा...

भूषण देसाई शिंदे गटात जाणार? ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, वडिलांच्या मंत्रिमंडळाचा फायदा...

उध्दव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत

मुंबई : राज्यात अभुतपूर्व गोंधळ सुरु असतानाच उध्दव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भूषण देसाई आज सायंकाळी बाळासाहेब भवन येथे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भूषण देसाई शिंदे गटात जाणार? ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, वडिलांच्या मंत्रिमंडळाचा फायदा...
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! सुभाष देसाईंचा मुलगा शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

सुभाष देसाई हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्या मुलाचा काहीही हातभार नाही. भूषण देसाई स्वतःच्या फायद्यासाठी आणि दबावाला घाबरून ते शिवसेनेत जात असतील. आठ वर्षे वडिलांच्या मंत्रिमंडळाचा फायदा घ्यायचा आणि मग पक्ष सोडायचा असे सुरू आहे, असे टीकास्त्र वैभव नाईक यांनी भूषण देसाईंवर सोडले आहे.

तर, सिंधुदुर्गमध्ये वैभव नाईक यांना जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवले आहे. यावरुन वैभव नाईक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबत ते म्हणाले, सिंधुदुर्गामध्ये मी एकटा आमदार विरोधी पक्षात आहे. जिल्हा प्रमुख माझ्या सांगण्यावरून बदलले आहेत. मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी शिवसेना सोडणार नाही, असे नाईकांनी स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com