Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Team Lokshahi

अर्थसंकल्पात मधाचे बोट लावण्याचे काम; उध्दव ठाकरेंचे टीकास्त्र

शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिलांसाठी मोठ्या घोषणा शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आल्या. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गाजर हलवा असे अर्थसंकल्पाचे वर्णन उध्दव ठाकरेंनी केले आहे.

Uddhav Thackeray
Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वर्षाला मिळणार 12 हजार

एकूणच आजचा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर सर्व समाजातील घटकांना मधाचे बोट लावण्याचे काम झालेले आहे. लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस झाला तेव्हा मुंबईत गडगडाटही झाला. गडगडाट झाला पण पाऊस पडला नाही. गरजेल तो बरसेल काय असा हा अर्थसंकल्प आहे. गाजर हलवा अर्थसंकल्प असे मी वर्णन करेल. आम्ही ज्या योजना केल्या होत्या. त्याचेच नामांतर करुन पुढे मांडल्या आहेत, अशी टीका उध्दव ठाकरेंनी केली.

शेतकऱ्यांना मदतीपेक्षा हमखास भाव कसा मिळणार याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही. अर्थसंकल्प वाचताना दीपक केसरकरांनी अनेकदा पंतप्रधानांचा उल्लेख केला. परंतु, पंतप्रधान सत्तेत येत असताना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशी घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर काहीच नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने याआधीचे दोन-तीन अर्थसंकल्प मांडलेले होते. त्यावेळी करोनाची परिस्थिती होती. केंद्र सरकार आमच्या बाजुने नव्हते. प्रत्येक वेळेला 25 हजार कोटींची जीएसटीची थकबाकी ही बाकी असायची. आमची अशी अपेक्षा होती. महाशक्तीचा पाठींबा असलेले या सरकारला जवळपास सहा महिने सरकार झाले आहेत. मी छत्रपती संभाजीनगरमधील एका शेतकऱ्याशी संवाद साधला. अद्यापही शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यास कोणताही अधिकारी गेलेला नाही, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com