अमृता फडणवीसांच्या ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट;   उद्धव ठाकरे आणि अनिल जयसिंघानीयांचा एकत्र फोटो समोर

अमृता फडणवीसांच्या ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट; उद्धव ठाकरे आणि अनिल जयसिंघानीयांचा एकत्र फोटो समोर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना वडिलांना सोडवण्यासाठी एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाच देण्याची ऑफर दिली होती.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना वडिलांना सोडवण्यासाठी एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाच देण्याची ऑफर दिली होती. याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. याबाबत आता नवीन ट्विस्ट झाला आहे. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानीया यांचा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

अमृता फडणवीसांच्या ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट;   उद्धव ठाकरे आणि अनिल जयसिंघानीयांचा एकत्र फोटो समोर
मुख्यमंत्र्यांच्या घोषणांनंतरही शेतकरी आंदोलन सुरुच; मोर्चाचे नेते म्हणाले...

अनिल जयसिंघानीया यांनी 2014 मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. मातोश्री येथे उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत अनिल जयसिंघानीया यांनी शिवबंधन बांधले होते. या पक्षप्रवेशाचे फोटो आता समोर आले आहेत. तर, याआधीही अनिल जयसिंघानीया यांनी 1995 व 1997 साली कॉंग्रेसच्या तिकीटावर उल्हासनगर महापालिका लढवली होती. मात्र, दोन्ही वेळेस त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर 2002 साली अनिल जयसिंघानीया राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे राहिले व विजयी झाले.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघानीयाविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. अनिक्षा जयसिंघानीया २०१५-१६ मध्ये अमृता फडणवीस यांना भेटत होती. २०२१मध्ये पुन्हा भेटीगाठी सुरु झाल्या. डिझायनर असल्याचे सांगून अनिक्षाने संपर्क केला होता. आई वारल्याचे सांगून तिने पुस्तक प्रकाशन करुन घेतले होते.

अमृता यांचा विश्वास संपादन करून डिझायनर कपडे परिधान करण्यास दिले. यानंतर वडिलांना काही चुकीच्या प्रकरणात अडकवल्याचा दावा अनिक्षाने केला. यासाठी अमृता फडणवीसांना निवेदन देण्यास सांगत त्यांच्यावर दबाव आणला. वडिलांना सोडवण्यासाठी १ कोटी रुपये देण्याचा आमिषही दाखवले. परंतु, चुकीच्या प्रकारात मदत करणार नसल्याचे अमृता यांनी सांगितले, असे फडणवीसांनी सांगितले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com