कोर्टाचा दिलासा! राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना जामीन मंजूर

कोर्टाचा दिलासा! राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना जामीन मंजूर

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. यावर आज न्यायालयात सुनावणी झाली आहे.

मुंबई : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. यावर आज न्यायालयात सुनावणी झाली आहे. याप्रकरणी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यांवर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

कोर्टाचा दिलासा! राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना जामीन मंजूर
राज ठाकरेंची भूमिका मनसेला सत्तेचा मार्ग दाखविणार का?

सामनामध्ये राहुल शेवाळेंच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचा राहुल शेवाळे यांनी आरोप केला होता. यावरून त्यांनी कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं. सुनावणी दरम्यान व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उद्धव ठाकरे यांना हजर राहण्यासाठी राहुल शेवाळे यांच्या वकील चित्रा साळुंखे यांनी विरोध केला होता. राहुल शेवाळे यांच्याशी फोनवर संवाद झाल्यानंतर आक्षेप मागे घेतला. यापुढील सुनावणीत उद्धव ठाकरे व्हिसीद्वारे हजर राहणार आहेत. दरम्यान, सुनावणी करताना संजय राऊत आणि उध्दव ठाकरेंना 15 हजारांच्या जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय होते सामना संपादकीय?

मध्यंतरी राहुल शेवाळे यांच्यावर शोषणाचा आरोप करण्यात आला होता. यावरुन सामना संपादकीयमधून शेवाळेंवर हल्लाबोल करण्यात आला होता. दिल्लीच्या भाषेत ज्यास ‘कबुतरबाजी’ म्हटले जाते अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला. हे गंभीर आहे. शेवाळे यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक व राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे हे कारस्थान आहे व त्यामागे शिवसेनेचे लोक आहेत. शेवाळे यांचा हा दावा खरा नाही. संबंधित महिलेसोबतचे जे चित्रण प्रसिद्ध झाले त्याचे चित्रीकरण विविध ठिकाणी याच प्रेमी युगुलाने केले आहे. येथे शिवसेनेचा प्रश्न येतोच कोठे? बाकी राष्ट्रीय तपास यंत्रणेत देशभावना जागरूक असेल तर महाराष्ट्रातील खासदारांच्या कबुतरबाजीचे प्रकरण खणून काढील व ती कोणाचीही गय करणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com