राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर उध्दव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर उध्दव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मानहानीप्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे

मुंबई : मानहानीप्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. याविरोधात विरोधक आक्रमक झाले असून मोदी सरकारविरोधात टीका करत आहेत. असातच, उध्दव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर उध्दव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
चोर म्हंटल्यावर कारवाई होते तर आम्ही डाकू म्हणणार; नाना पटोलेंचे टीकास्त्र

काय म्हणाले उध्दव ठाकरे?

चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. याप्रकरणी अखेर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामध्ये न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीनही मंजूर केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com