अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटात इन्कमिंग सुरु आहे.

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटात इन्कमिंग सुरु आहे. अंडरवर्ल्ड अरुण गवळीचा भाऊ प्रदीप गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासह मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी व अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासंबंधी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन माहिती दिली.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश
सूडाची तलवार चालवण्यासाठी दिल्लीने पुन्हा एकदा मराठी माणसाचाच केला वापर; राऊतांचे टीकास्त्र

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्य लोकांचे सरकार असून या राज्याला पुढे घेऊन जाणार सरकार आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास करणारे सरकार आहे. तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचे काम आपले कार्यकर्ते करतील, याची मी तुम्हाला खात्री देतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com