शिवसेनेतून का बाहेर पडले? राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

शिवसेनेतून का बाहेर पडले? राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर सभा पार पडत आहे.

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर सभा पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर भाष्य केले. तसेच, आपण पक्षातून बाहेर का पडलो, याचा खुलासा केला आहे. संपलेला पक्ष आहे असे म्हणत होते. जे बोलले त्यांची अवस्था काय, असा टोमणाही त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

शिवसेनेतून का बाहेर पडले? राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा
Video : अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर कापूस व खोके फेकून ठाकरे गटाची घोषणाबाजी

महाराष्ट्राचे एकूण स्थिती पाहता मागील काही दिवसांमध्ये राजकारणाचा बट्ट्याबोळ सर्वच जण पाहत आहेत. हे सगळ राजकारण पाहत असताना मला वाईट वाटत होते. मात्र, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण नक्की कोणाचं, तुझं की माझं ह्यावर रस्सीखेच सुरु होती ते पाहताना मला त्रास होत होता. 'शिवसेना' मी लहानपणापासून जगलो. दुसरीत असल्यापासून शर्टाच्या खिशावर शिवसेनेचा वाघ अभिमानाने मिरवायचो. शिवसेना सोडताना मला वेदना झाल्या. मी शिवसेना सोडताना म्हणलं होतो की 'माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे'. मी शिवसेना सोडल्यानंतर बोललो होतो की हीच चार टाळकी शिवसेनेला अडचणीत आणणार. मला त्याचं वाटेकरी व्हायचं नव्हतं, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.

पक्ष स्थापनेच्या वेळेस, खरंतर मी शिवसेना का सोडली ह्यावर बोललो असतो. पण मी बोललो नाही. शिवसेना सोडताना ज्या अफवा उठवल्या की मला शिवसेनाप्रमुखपद हवं होतं. हे सर्व चुकीचं आहे. शिवसेना हे शिवधनुष्य आहे ते फक्त बाळासाहेबांना पेलवलं. एकाला पेलवलं नाही, दुसऱ्याला पेलवेल की नाही कळेलच, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

शिवसेना सोडताना नक्की काय झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो की, मी उद्धव ठाकरेंना बसवून एकदा विचारलं, तुला काय हवं आहे, पक्षप्रमुखपद, सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हवं आहे? यात मला माझा रोल काय आहे ते सांग. मी सांगितलं की मला फक्त प्रचाराला बाहेर काढायचं असं करू नका. उद्धव म्हणाले की, मला काहीच नको आहे. आम्ही बाळासाहेबांकडे गेलो आणि सांगितलं की सगळं नीट झालं आहे. बाळासाहेब अधीर होते उद्धव यांना भेटायला पण ते बाळासाहेबांच्या समोर आलेच नाहीत. कारण उद्धव यांना शिवसेनेत आम्ही नको होतो, असे मोठा खुलासा राज ठाकरेंनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com