uddhav Thackeray
uddhav Thackeray Team Lokshahi

राष्ट्रवादी फोडायची काय गरज होती? ठाकरेंचा भाजपला सवाल

भाजपला ठाकरे नको, शिवसेना हवी, माझा कारभार वाईट असेल तर मला जनता प्रश्न विचारेल. बंडखोरांचा मालिक एकच आहे. मत कुणालाही द्या, सरकार माझचं येणार, अशी भाजपची निती आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. त्यानंतर आता राष्ट्रवादीतही दोन गट तयार झाले. हा सर्व राजकीय गोंधळ सुरू असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी आजच्या यवतमाळ येथील सभेत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर बावनकुळेंच्या एका शब्दात टीका; म्हणाले...

नेमकं काय म्हणाल उद्धव ठाकरे?

यवतमाळ येथे भाषणात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपला अजून भाजप पक्ष झाला नाही. भाजपचा आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर होते यांनी मेहनत करुन भाजप वाढवला. मात्र आता निष्ठावंताची काय हालत होत आहे. भाजपला ठाकरे नको, शिवसेना हवी, माझा कारभार वाईट असेल तर मला जनता प्रश्न विचारेल. बंडखोरांचा मालिक एकच आहे. मत कुणालाही द्या, सरकार माझचं येणार, अशी भाजपची निती आहे. आता राष्ट्रवादी फोडायची काय गरज होती, असा सवाल करत त्यांनी भाजपवर टीका केली.

पुढे ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे लोकांच्या मनात आहेत. त्यांना कोणीही काढू शकत नाही. भ्रष्टाचाराने माखलेल्या लोकांच्या सतरंज्या आता भाजपमधील निष्ठावंत अंधभक्त उचलत आहेत. राज्यात आता फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. आधी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं आता खोक्यातून सरकार जन्माला येत. असा खोचक टोला त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला लगावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com