मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' 15 महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू, संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ यांसह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य सरकारने घेतलेले निर्णय
वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला 'स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू' असे नाव देण्यास मान्यता देण्यात आली. हा आठपदरी सागरी सेतू ९.६ किमीचा असून त्यासाठी ११,३३२ कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच याला ७.५७ किमी जोड रस्ता असेल. डिसेंबर २०२६ पर्यंत हा सागरी सेतू पूर्ण होईल.
एमटीएचएल’ला 'अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू' असे नाव
राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटी रुपयांस मान्यता
राज्यातील महात्मा ज्योतीरावफुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून याद्वारे नागरिकांना ५ लाख रुपये एवढे आरोग्य संरक्षण देण्याचा निर्णय झाला. याअंतर्गत सुमारे २ कोटी कार्ड्सचे वाटप केले जाईल.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये इतके मासिक अर्थसहाय्य मिळेल.
गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
पाकिस्तानने पकडलेल्या मच्छिमारांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार
पर्यटन उपविभागासाठी उप सचिव दर्जाचे पद मंजूर
दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार.१२ लाख विद्यार्थ्यांना लाभ
देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
सर जेजे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांसाठी 'सिडबी'शी करार
बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय सुरू करणार
दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविणार