Maruti Suzuki's First EV : मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV 'e-Vitara' प्रीमियम वैशिष्ट्यांसह करणार भारतीय बाजारात एन्ट्री

Maruti Suzuki's First EV : मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV 'e-Vitara' प्रीमियम वैशिष्ट्यांसह करणार भारतीय बाजारात एन्ट्री

भारतीय ग्राहकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या मारुती सुजुकी या कंपनीकडून अखेर त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV 'e-Vitara' च्या लॉन्च तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारतीय ग्राहकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या मारुती सुजुकी या कंपनीकडून अखेर त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV 'e-Vitara' च्या लॉन्च तारखेची घोषणा करण्यात आली आहे. 3 सप्टेंबर 2025 रोजी ही गाडी भारतीय बाजारात अधिकृतपणे सादर होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ही गाडी चर्चेचा विषय बनली होती. याआधी ऑटो एक्स्पो 2025 मध्ये याचे पहिले दर्शन घडले होते. त्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आता लॉन्चची तारीख निश्चित झाल्याने कारप्रेमींमध्ये नवचैतन्य आणि उत्साह संचारला आहे.

डिझाईन आणि रंगसंगती

e-Vitara ही गाडी एकूण 10 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये 6 मोनो-टोन रंग आणि 4 ड्युअल-टोन शेड्सचा समावेश आहे. Nexa Blue, Opulent Red, Grandeur Grey, Bluish Black, Splendid Silver आणि Arctic White हे मोनो-टोन रंग ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.

प्रगत वैशिष्ट्यांची रेलचेल

या गाडीला एक प्रीमियम लूक देण्यासाठी कंपनीने अनेक अत्याधुनिक फिचर्सचा समावेश केला आहे. यामध्ये एलईडी हेडलॅम्प्स, डीआरएल्स आणि टेललॅम्प्ससह 18 इंचांचे अ‍ॅलोय व्हील्स व अ‍ॅक्टिव्ह एअर व्हेंट ग्रिल देण्यात आले आहेत, जे तिच्या अ‍ॅरोडायनॅमिक कार्यक्षमतेत भर घालतात.

गाडीमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ मल्टी-कलर अँबियंट लाइटिंग, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणालीही देण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रणाली वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेला सपोर्ट करते.

सुरक्षिततेबाबत विशेष लक्ष

सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील e-Vitara मध्ये अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. गाडीला 7 एअरबॅग्ससह ADAS प्रणाली देण्यात आली असून त्यात लेन कीप असिस्ट आणि अ‍ॅडप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, 360 डिग्री कॅमेरा आणि फ्रंट-रिअर पार्किंग सेन्सर्स हेही फिचर्स गाडीत उपलब्ध आहेत.

किंमत आणि व्हेरिएंट्स

प्राथमिक अंदाजानुसार, e-Vitara ची सुरुवातीची किंमत सुमारे 17 ते 18 लाख रुपये दरम्यान असू शकते. मात्र, टॉप-एंड व्हेरिएंटसाठी ही किंमत 25 लाखांपर्यंत जाऊ शकते, असे उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा

Maruti Suzuki's First EV : मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV 'e-Vitara' प्रीमियम वैशिष्ट्यांसह करणार भारतीय बाजारात एन्ट्री
Jitendra Awhad : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ समोर; जितेंद्र आव्हाडांनी केलं ट्विट
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com