Railway Mega Block : मुंबईकरांनो! लोकलचं वेळापत्रक बघून करा प्रवास; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी, 15 जून रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Rashmi Mane

अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी, 15 जून रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही ब्लॉक असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. तसेच पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्टेशनदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.

हेही वाचा

Railway Mega Block : मुंबईकरांनो! लोकलचं वेळापत्रक बघून करा प्रवास; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
Air India plane crash : चमत्कार! विमानातील सर्व सामान जळून खाक; मात्र अखंड श्रीमद्भगवद्गीता लागली हाती
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com