Mumbai Local Megablock
बातम्या
Mumbai Mega Block : मुंबईकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी नियोजन करा, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज घराबाहेर पडण्याआधी प्रवासाचं नियोजन करा. लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या...
मुंबई : ठाणे ते कल्याण पाचवा-सहावा मार्ग आणि कुर्ला ते वाशी या मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
प्रगती एक्स्प्रेससह अन्य मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वे -
स्थानक - ठाणे - कल्याण
मार्ग - पाचवा आणि सहावा
वेळ - सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत
हार्बर रेल्वे -
स्थानक - कुर्ला - वाशी
मार्ग - अप आणि डाऊन
वेळ - सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
पश्चिम रेल्वे - सकाळी ब्लाॅक नाही…
स्थानक - बोरिवली ते भाईंदर
मार्ग - अप आणि डाऊन जलद
वेळ - शनिवार रात्री 11.45 ते रविवार पहाटे 4.45 संपणार