Kishor Appa Patil
Kishor Appa PatilTeam Lokshahi

मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज ?

शिंदे गटातील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ

मंगेश जोशी | जळगाव : शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे गटातील अनेक आमदार हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यालयात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या फोटो वरून प्रतिक्रिया देताना " कुठलेही काम करताना घाई करू नये" अशी सूचक प्रतिक्रिया देत अस्पष्ट पने नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.

किशोर आप्पा पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू असून मंत्रिमंडळाच्या वितारानंतर " कुठलेही काम करताना घाई करू नये " या वक्तव्यामुळे किशोर आप्पा पाटील हे घरवापासी करणार का ? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

त्यातच युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेनिमित्त उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून पाचोरा येथे आदित्य ठाकरे हे शिव संवाद साधणार आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांचे देखील आपल्या मतदारसंघात स्वागत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातील फोटो वरून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर किशोर आप्पा पाटील यांनी किमान आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापर्यंत तरी फोटो राहू द्या. मला भविष्यात कसं काम करायचं आहे याचे माझे पूर्णपणे प्लॅनिंग झाल्याचे देखील सूचक वक्तव्य किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे.

Kishor Appa Patil
शरद पवारांना नाकारणाऱ्या ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटलांचे निमंत्रण स्वीकारलं
Lokshahi
www.lokshahi.com