सत्तेचा फायदा स्वतःसाठी करणाऱ्यांची माझ्यावर बोलण्याची पात्रता नाही; नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका

सत्तेचा फायदा स्वतःसाठी करणाऱ्यांची माझ्यावर बोलण्याची पात्रता नाही; नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका

नांदेड लोकसभेच्या प्रचारा दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात आता आरोप - प्रत्यारोप सूरु झालयं.
Published by :
shweta walge

नांदेड लोकसभेच्या प्रचारा दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात आता आरोप - प्रत्यारोप सूरु झालयं. मंत्रीपदासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार टीकल असत असं अशोक चव्हाण म्हणाले होतें. त्यावरुन नाना पटोले यांनी अशोक यांना प्रतिउत्तर दीलंय.

ते म्हणाले की, बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून त्यांचाकडे नोटा छापायची मशीन होती. ती बंद पडली त्याचा त्रास अशोक चव्हाण यांना होत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

सत्तेचा फायदा स्वतः साठी करणारे अशोक चव्हाण यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही, ज्या काँगेसमध्ये राहिले त्याच काँगेसमधील लोकांना हरवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

त्यांनी काँग्रेस बद्दल बोलू नये त्यांचे अंडे पिल्ले काढण्याचे औषध माझ्याकडे आहे. त्याच्याच पक्षातील आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत अशोक चव्हाण यांचा चीट्टा वाचून दाखवला होता. त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे. कसं कमिशन खातात मला माहीत असल्याचे नाना पटोले म्हणाले. त्यांनी राज्यात काय काय पाप केले याची मोठी जंत्री माझ्याकडे आहे. ज्या पक्षात राहतात तिथे गड्डा करतात. भाजपात काय गड्डा केला हे निकालानंतर तुम्हाला पाहायला मिळेल असं नाना पटोले म्हणाले.

सत्तेचा फायदा स्वतःसाठी करणाऱ्यांची माझ्यावर बोलण्याची पात्रता नाही; नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका
'तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही' फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com