ताज्या बातम्या
'शरद पवारांबाबत मनात शंका...' काका-पुतण्यांच्या भेटीनंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्यात पहील्यांदाच दोघात ही गुप्त बैठक पार पडली. या भेटीमुळे अनेक चर्चाना उधाण आलं आहे. यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे.
नाना पटोले म्हणाले की, 'आमच्या मित्र पक्षांमध्ये काय सुरू आहे याकडे लक्ष देण्याची आमची भूमिका नाही. भाजपाच्या विरोधात जे लढायला तयार असतील, त्यांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ. शरद पवारांबाबत मनात शंका असण्याचं कारण नाही. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत आणि पक्षात काय घडामोडी घडतायेत त्याकडे लक्ष देण्याचा आम्हाला कारण नाही'