अजित पवारांकडून नव्या कार्यकारणीची घोषणा, 'हे' असणार नवे प्रदेशाध्यक्ष
Team Lokshahi

अजित पवारांकडून नव्या कार्यकारणीची घोषणा, 'हे' असणार नवे प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा
Published by  :
shweta walge

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फ केलं. त्यानंतर काहीच वेळात अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे.

अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रफुल्ल पटेल यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यासोबतच त्यांनी यावेळी बोलताना विरोधी पक्षनेता आणि प्रतोद या पदांवर एकच व्यक्ती असू शकत नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com