NCP | D gang
NCP | D gangTeam Lokshahi

राष्ट्रवादी काँग्रेसचे 'डी' गॅंग कनेक्शन उघड, राज्याचे राजकारण तापणार

नवाब मलिक मुंबईचे अध्यक्ष असताना त्यांनी या पदाधिकाऱ्यांची केली होती नियुक्ती
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या अभूतपूर्व गोंधळ सुरु असताना अशातच राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून देणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी माजी अल्पसंख्याक मंत्री हे सध्या कोठडीत असताना दरम्यान, राष्ट्र्वादीबाबत पुन्हा एक धक्कादायक बातमीसमोर आली आहे. मध्यंतरी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीविरोधात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली होती. यामध्ये 5 जणांना अटक केली असून आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.

NCP | D gang
ठाकरे गटाच्या 'मशाल' चिन्हावर कोर्टाचा मोठा निर्णय, समता पक्षाची याचिका फेटाळली

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसचे डी कनेक्शन उघडं झाल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक मुंबईचे अध्यक्ष असताना त्यांनी या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकारी अमजद रेडकरच्या अटकेनं पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. खंडणी प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

NCP | D gang
'शिंदे सरकार म्हणजे घोषणा सरकार, फक्त बसेसवर स्वतःचे फोटो लावण्यात व्यस्त'

दाऊदचा जवळचा साथीदार गँगस्टर छोटा शकील आणि रियाज भाटीला अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने अमजद रेडकर , अजय गंडा, फिरोज लेदर, समीर खान, पापा पठाण या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी गँगस्टर छोटा शकील आणि मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटीला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये पोलीस फिर्यादीत डी गँगचा उल्लेख आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा डी कंपनीशी संबंध असलेला बोललं जात होत ते आता खरं ठरताना दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com