भाजपमध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितलं
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. लवकरच जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व चर्चांना जयंत पाटलांनी पूर्णविराम लावला आहे. माझी कुणाशीही भेट झाली नाही. भेट झाल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, प्रसारमाध्यमांवरच्या बातम्या मी सकाळपासून ऐकल्या माझं खूपच मनोरंजन झालं. मी कालही पवार साहेबांना भेटलो काल रात्री मी माझ्या पक्षातले वरिष्ठ आमदार आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि आज सकाळी देखील मी पवार साहेबांना भेटलो. त्यामुळे आपण ज्या बातम्या चालवलेल्या आहेत, की मी दिल्लीत भेटलो किंवा अन्य कुठे भेटलो यात कुठलीही स्पष्टता नाही. असं म्हणत त्यांनी या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
अशा बातम्यांमध्ये कुठेतरी कोणी गैरसमज पसरवत आहे. असं मी म्हणणार नाही कारण या बातम्या या चैनल वरच्या आहेत. माझी विनंती आहे अशा बातम्या चालवताना खात्री बाळगूनच त्या चालवायला हव्यात. अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली आहे.