नवीन वर्षात उद्यापासून होणार 'हे' मोठे बदल

नवीन वर्षात उद्यापासून होणार 'हे' मोठे बदल

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे. उद्यापासून नवीन वर्षाला सुरूवात होईल. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाही काही महत्वाचे बदल होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला असे अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट तुमच्याशी संबंध आहे. काय आहेत हे बदल जाणून घ्या

गँस सिलेंडरच्या किंमती बदलणार

गँस सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. तेल कंपन्यांकडून गँस सिलिंडरच्या दरात कपात केली जाऊ शकते.

क्रेडिट कार्डचे नियम बदलणार

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच क्रेडिट क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट्स भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वाहनांच्या किमतीत वाढ

२०२३ मध्ये नवीन वाहनांच्या किंमतीत वाढ होणार आहे. एमजी मोटर, मारुति सुजुकी, ह्युंडई मोटर्स, होंडा, टाटा मोटर्स, रेनॉल्ट, ऑडी आणि मर्सिडीज-बेंच या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

बँक लॉकरचे नियम बदलणार

नवीन वर्षात बँक लॉकरचे नियम बदलणार आहे. रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी बँक लॉकरसंबंधित नवे नियम जाहीर केले, ज्याची १ जानेवारी २०२३ पासून अंमलबजावणी केली जाईल.

पॅन कार्ड होऊ शकते रद्द

नवीन वर्षात तुम्हाला तुमचे आधारकार्ड पॅनकार्डसोबत जोडणे बंधनकारक आहे. ज्या लोकांनी हे काम केलं नाही, त्यांचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते.

नवीन वर्षात उद्यापासून होणार 'हे' मोठे बदल
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी नाशिकमधील 'या' सहा वाईनयार्ड्सला भेट द्याच
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com