पेंग्विन आणि UT ने दीशा सालियनच्या खटल्याच्या भितीने कोणाला किती पैसे दिले? हा पण गौप्यस्फोट करायला लागेल - नितेश राणे
Admin

पेंग्विन आणि UT ने दीशा सालियनच्या खटल्याच्या भितीने कोणाला किती पैसे दिले? हा पण गौप्यस्फोट करायला लागेल - नितेश राणे

हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता राजकीय वातावरणात चर्चा रंगल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. एकनाथ शिंदे यांनी बंड का केले? यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. भाजपासोबत गेलो नाहीतर मी तुरुंगात असेन, असे त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर नितेश राणे यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, जेलच्या भितीने शिंदे साहेब भाजपाबरोबर गेले, मग पेंग्विन आणि UT ने (उद्धव ठाकरे) दीशा सालियनच्या खटल्याच्या भितीने कोणा-कोणाचे हात पाय पकडले. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले? हा पण गौप्यस्फोट करायला लागेल, लवकरच. ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी हैं’ असे म्हणत नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे.

पेंग्विन आणि UT ने दीशा सालियनच्या खटल्याच्या भितीने कोणाला किती पैसे दिले? हा पण गौप्यस्फोट करायला लागेल - नितेश राणे
आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; सरळ सांगूनच टाकले की, एकनाथ शिंदे आमच्या घरी येऊन रडले आणि...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com