Private Sticker : वाहनांवर चुकीच्या स्टिकर्समुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका
Private Sticker : आपल्या भारत देशात शांतता आणि सुव्यवस्था असावी यासाठी आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र आपल्या समाजात ज्या अश्या काही घटना घडतात ज्यासाठी कायद्यामध्ये कोणतीही दंडात्मक कारवाई होत नाही. परिणामी समाजात अनेक अनुचित प्रकार होत राहतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बऱ्याच वेळेला बहुतेक गाड्यांवर खासदार, आमदार किंवा पोलीस नावाचे स्टिकर लावल्याचं तुम्ही पाहिलं असेल. खासदार, आमदार आणि पोलीस यांच्या गाडीवरील स्टिकरचा सर्वसामान्य नागरिकांकडून बऱ्याच वेळेला गैरवापर केला जात असतो. विशेष म्हणजे हा कायद्याने गुन्हा असुनही त्यासाठी कायद्यामध्ये कोणतीही दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद नाही.
आपल्या देशात जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे एखाद्या पक्षाचे किंवा सरकारचे पदाधिकारी आहेत. त्यांनाच फक्त आपल्या स्वतः च्या खाजगी वाहनांवर खासदार आमदार असे अधिकृत स्टिकर्स लावण्याची परवानगी असते. मात्र असे असताना बऱ्याच वेळेला सामान्य नागरिक अश्या स्टिकर्सचा फायदा घेताना दिसतात. अश्या प्रकारे खासगी वाहनांवर खासदार आणि आमदारांचे स्टिकर लावणे, हे नियमांनुसार चुकीचे आहे . या स्टिकर्सचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे, असे स्टिकर लावल्यास कारवाई होऊ शकते. खासगी वाहनांवर खासदार किंवा आमदारांचे स्टिकर लावणे, हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अनेकदा लोक त्याचा गैरफायदा घेताना दिसतात. बऱ्याच वेळेला लोक अश्या प्रकारचे स्टिकर्स लावून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात किंवा अश्या स्टिकर्स लावलेल्या वाहनांना पोलिसांकडून बऱ्याच वेळेला तपासले जात नाही. त्यामुळे या स्टिकर्सच्या माध्यमातून Private Stickerअपहरण, किंवा मद्यपान करून गाडी चालवणे असे प्रकार घडतात आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही.
मात्र अश्याप्रकारे स्टिकर्सचा गैरफायदा घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे अश्या प्रकारच्या गोष्टींना आळा घातला जाऊ शकतो.https://www.lokshahi.com/news/silver-prices-have-increased-in-the-backdrop-of-iran-israel-war-the-price-of-10-grams-of-gold-has-crossed-rs-99000-and-the-price-of-silver-has-crossed-rs-1-lakh