Pankaja Munde
Pankaja Munde Team Lokshahi

Pankaja Munde : कॉम्प्रमाईजचं राजकारण मला शक्य नाही; पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पार पडलेल्या चर्चासत्रात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तर देताना ''कॉम्प्रमाईजचं राजकारण करणं मला शक्य नाही'', असं मोठं विधान केलं.
Published by :
shweta walge
Published on

नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पार पडलेल्या चर्चासत्रात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तर देताना ''कॉम्प्रमाईजचं राजकारण करणं मला शक्य नाही'', असं मोठं विधान केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या,

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा मी आमदार झाल्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी माझी मुलाखत घेतली होती. तेव्हा मी उत्तर दिलं होतं की, ज्या निमित्ताने मी राजकारणात आले, ते करण्यासाठी माझ्या मनात अमुक-अमुक विचार आहे, असं पकंजा मुंडे म्हणाल्या.

ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आले. त्या गोष्टी समाजासाठी करण्याची जर मला मुभा नसेल, तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य नाही”, असं स्पष्ट विधान पंकजा यांनी केलं.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, प्रत्येक किलोमीटरवर हायवेवर एक एक्झिट असतो. स्वाभिमानाचा एक्झिट केव्हाही बरा. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडायची मला भीती वाटत नाही”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

पंकजा मुंडेंना विधान परिषद किंवा दुसऱ्या ठिकाणी संधी का दिली जात नाहीय? असा दुसरा प्रश्न मुंडे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, ''या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. मला संधी न देणारेच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील'', असं त्या म्हणाल्या. तसंच ''महाभारतातील भीष्म पीतामह कॅरेक्टर मला शोभतं'', असं त्या म्हणाल्या.

पंकजा यांना संकट आल्यावर काय करता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. “मी फार बोलत नाही. खूप low feel झाल्यावर मी मित्र-मैत्रिणी यांच्याशी बोलते. माझे खूप मित्र आहेत. माधुरी मिसाळ यांना मी माझी मोठी बहीण मानते. त्यांनी खूप खूप मायेचा हात दिलाय”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
“सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला…”,प्रीतम मुंडेंचं पंकजा मुंडेंबाबत मोठं विधान
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com