मोठी बातमी! नेपाळमधील पोखरा येथे ६८ प्रवाशांसह विमान कोसळले

मोठी बातमी! नेपाळमधील पोखरा येथे ६८ प्रवाशांसह विमान कोसळले

नेपाळमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे.

नवी दिल्ली : नेपाळमध्ये आज मोठा विमान अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. नेपाळमधील पोखरा येथे एक प्रवासी विमान कोसळले असून त्यात 68 प्रवासी होते आणि चार क्रू मेंबर्स होते. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलीस तसेच स्थानिक नागरिक युध्द पातळीवर बचाव कार्य करत आहेत. यादरम्यान आतापर्यंत 32 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मोठी बातमी! नेपाळमधील पोखरा येथे ६८ प्रवाशांसह विमान कोसळले
गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमास फडणवीस राहणार हजर; पंकजा मुंडेंची मात्र पाठ, चर्चांना उधाण

माहितीनुसार, नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. अपघातग्रस्त विमान यति एअरलाईन्सचे असल्याचे सांगितले जात आहे. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले. पोखराचे जुने देशांतर्गत विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हा अपघात झाला. सध्या बचावकार्य सुरू असून त्यासाठी विमानतळ बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावी बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेबाबत त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही बोलावली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com