PM मोदी म्हणाले 'मी पुन्हा येईन'; जितेंद्र आव्हाड म्हणाले 'येणार नाहीत याची काळजी...'

PM मोदी म्हणाले 'मी पुन्हा येईन'; जितेंद्र आव्हाड म्हणाले 'येणार नाहीत याची काळजी...'

देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून संबोधित केलं.
Published by :
shweta walge
Published on

देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाष्य करताना २०२४ मध्येही आपणच लाल किल्ल्यावरुन भाषण करु असा विश्वासही व्यक्त केला. यावरच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मी पुन्हा येईन असं जाहीर केलं. पण ते येणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आपण शपथ घेऊ आणि पक्ष पुढे नेऊ. साहेबांनी पक्ष बांधला शत्रू नंबर एक कोण हे मनात विचार करून ठेवा त्याचा पराभव केला पाहिजे लोकशाही सुदृढ केली पाहिजे असं यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी येणारी पाच वर्षे हा सर्वात मोठा सुवर्ण क्षण आहे. पुढच्या वेळी 15 ऑगस्टला मी या लाल किल्ल्यावरून देशाचे यश आणि विकास तुमच्यासमोर मांडणार आहे. येत्या 15 ऑगस्टला पुन्हा येईल. मी फक्त तुमच्यासाठी जगतो, मी तुमच्यासाठी घाम गाळतो, कारण तूम्ही माझा परिवार आहात अस मोदी म्हणाले आहेत.

PM मोदी म्हणाले 'मी पुन्हा येईन'; जितेंद्र आव्हाड म्हणाले 'येणार नाहीत याची काळजी...'
मोदींनी लाल किल्ल्यावरून वाजवले 2024 चे बिगुल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com