PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं क्रोएशियात ऐतिहासिक स्वागत; भारतीय संस्कृतीचं झाग्रेबमध्ये दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलीकडील क्रोएशिया दौरा ऐतिहासिक ठरला आहे. क्रोएशियाची राजधानी झाग्रेबमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. या देशाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या आगमनानंतर हॉटेलमध्ये उपस्थित भारतीय समुदायाने “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय” च्या घोषणा दिल्या. यासोबत पारंपरिक भारतीय नृत्यांचा कार्यक्रमही सादर करण्यात आला.
विशेष म्हणजे, पांढऱ्या पारंपरिक पोशाखातील क्रोएशियन नागरिकांच्या एका पथकाने मोदींसमोर संस्कृतमधील ‘गायत्री मंत्र’ आणि अन्य श्लोकांचे पठण केले. यामुळे दोन्ही देशांतील सांस्कृतिक नाते अधिक दृढ असल्याचे अधोरेखित झाले. पंतप्रधान मोदींनी हा अनोखा अनुभव त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे.
या स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून लाखो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, “झाग्रेबमधील स्वागत अनुभवताना भारतीय संस्कृतीबद्दलचा आदर पाहून मन भरून आलं. ही नाती संस्कृतीच्या माध्यमातून अधिक मजबूत होत आहेत.” दुसऱ्या व्हिडिओ पोस्टमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे क्षण टिपलेले दिसतात. क्रोएशियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.