मला अटक करण्यासाठी चाणक्याचे पोलिसांना सतत फोन, जितेंद्र आव्हाड यांच्या मते चाणक्य कोण?

मला अटक करण्यासाठी चाणक्याचे पोलिसांना सतत फोन, जितेंद्र आव्हाड यांच्या मते चाणक्य कोण?

हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे.

हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे.माजी खासदार आणि राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि 12 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे. मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे. मला अटक व्हावी म्हणून पोलिसांना चाणक्यांचे वारंवार फोन येत होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नातेवाईकांशी बोलताना आव्हाड यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे आव्हाडांनी चाणक्य म्हटलेला व्यक्ती नेमका कोण आहे. हे पाहणं महत्वाचे आहे.

मला अटक व्हावी म्हणून पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्यात आला. पोलिसांना एका चाणक्याचे वारंवार फोन येत होते. मला अटक करण्यास सांगितलं जात होतं, मी स्वत:हून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलो होतो. पण मला खोटं बोलवून अटक करण्यात आली, असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com