पाकिस्तानचा वीजपुरवठा खंडित

पाकिस्तानचा वीजपुरवठा खंडित

पाकिस्तानमध्ये वीज व्यवस्था बिघडली आहे.
Published on

पाकिस्तानमध्ये वीज व्यवस्था बिघडली आहे, त्यामुळे इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीसारखी पाकिस्तानातील मोठी शहरे अंधारात आहेत.रकारने आठ वाजताच वीजसेवा बंद ठेवण्याचे आदेश पाकिस्तानातील विविध बाजारांतील व्यावसायिकांना दिले आहेत. दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अद्यापही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नवे दर लागू झाल्यामुळे ग्राहकांना ४३ रुपये प्रति युनिट वीज मिळत आहे. यावर सरकार वीज कंपन्यांना १० रुपये प्रति युनिटने सब्सिडीसुद्धा देत आहे. वीज संकटातून बाहेर पडण्याकरता पाकिस्तान सरकारने डिसेंबर २०२२ मध्ये बाजार आणि हॉटेल्समध्ये रात्री आठनंतर वीज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानात सातत्याने मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. पाकिस्तानात जीवनावश्यक वस्तुंची वाणवा असताना तिथे वीजेचीही कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या नॅशनल इलेक्ट्रिक पॉवर रेग्युलेटरी ऑथोरिटीने कराची शहरांतील वीजदरांत ३.३० रुपये प्रति युनिट वाढ केली आहे. सोमवारी सकाळी 7.30 च्या सुमारास पाकिस्तानच्या नॅशनल ग्रीडची सिस्टम फ्रिक्वेन्सी बिघडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने देशभरातील वीज यंत्रणा प्रभावित झाली आहे. अशी माहिती पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com