Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Team Lokshahi

मोदी यांच्या नावाची नेम प्लेट काढून टाकू, सत्तेत आल्यास संसद भवनाचं पुन्हा उद्घाटन करू - प्रकाश आंबेडकर

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन आता भाजपावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने भांडुप येथे संविधान बचाव सभा आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले की, मोदी प्रचंड प्रसिद्धीसाठी हावरट आणि हपापलेले आहेत. उद्घाटनाच्या दगडावर फक्त माझंच नाव हवं असा त्यांचा हेतू असतो.

तसेच लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली आणि आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचं पुन्हा उद्घाटन करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन करू. असे आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून निर्माण झालेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com