Raj Thackeray
Raj Thackerayteam lokshahi

कसब्यात मनसेला मोठा खिंडार; चाळीस ते पन्नास मनसैनिकांचा राजीनामा

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्जपुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. यातच मनसेला मोठा धक्का बसला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास मनसैनिकांनी राजीनामा दिला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

त्यानंतर आता मनसेतील 40 ते 50 मनसैनिकांनी राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे. राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. राजीनामा दिलेले मनसैनिक आता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार आहेत.

Raj Thackeray
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com