Mumbai Metro
Mumbai MetroTeam Lokshahi

मेट्रोच्या कामात अडथळा आणणे आता भारी पडणार, दंडासह तुरुंगवास भोगावा लागणार

मेट्रोच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार
Published by :
Shubham Tate

mumbai metro : बर्‍याचदा लोक मेट्रोच्या कारभारात अडचणी निर्माण करत असतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत की लोकांच्या चुकीमुळे मेट्रोचे कामकाज थांबवावे लागले आहे. मात्र मुंबईत आता हे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईची तयारी करण्यात आली आहे. खरे तर आता मुंबईत मेट्रोच्या कामात कोणी अडथळा आणला तर त्याला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. (mumbai punitive action will be taken for obstructing metro operation in mumbai)

Mumbai Metro
Independence Day 2022: ध्वज फडकवताना या गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम आणि कायदे

मेट्रोच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल

मुंबईत मेट्रोच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना आता मोठी किंमत मोजावी लागू शकते. प्रत्यक्षात मेट्रोच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असा इशारा महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबईकरांना दिला आहे.

Mumbai Metro
CSA T20 League : RCB सोडून फाफ डू प्लेसिसने पुन्हा CSK केलं जॉईन, जाणून घ्या कारण

इशारा का देण्यात आला?

दहिसर मेट्रो स्टेशनवर घडलेल्या घटनेनंतर मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (MMOCL) ला ही चेतावणी जारी करावी लागली. प्रत्यक्षात, मेट्रो स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, एका व्यक्तीने प्लॅटफॉर्म स्क्रीनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी ट्रेनचे कामकाज तीन मिनिटांसाठी थांबवावे लागले. या घटनेमुळे अनेक अडचणीही निर्माण झाल्या. त्यामुळे आता मेट्रोच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अशा लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे की, जे आपल्या कृत्यांमुळे मेट्रोच्या कामकाजात अडचणी निर्माण करतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com