CM Eknath Shinde Video Call
CM Eknath Shinde Video Call

नाशिक-शिर्डी अपघातातील रुग्णांची मुख्यमंत्री शिंदेंकडून विचारपूस, व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्हिडिओ कॉलद्वारे नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाशी संवाद साधला.

नाशिक : महेश महाले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्हिडिओ कॉलद्वारे नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस केली आहे. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील अपघातात जखमी झालेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केलीय. नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. अपघातातील सात मृतांची ओळख पटली असून पालकमंत्री दादा भुसे रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले होते.

CM Eknath Shinde Video Call
Sindhudurg Accident : मुंबई-गोवा महामार्गावर बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 23 जण जखमी

यामध्ये जवळपास 45 प्रवासी बसमध्ये प्रवास करत होते. अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली आहे. तर तीन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अपघातात मृत आणि जखमी झालेले सर्व प्रवासी ते सर्व अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे समजते आहे. शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघाले होते, मात्र वाटेत भीषण संकटाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले होते. त्यानंतर आज स्वतःहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून रुग्णांना धीर देऊन वैद्यकीय सेवेत कोठेही कमी पडू नयेत, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी हॉस्पिटलला दिलेत.

दरम्यान, यावेळी नातेवाईकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. ही अपघाती खासगी बस ही मुंबईहून सिन्नरच्या दिशेने जात होती, तर ट्रक शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने जात होता. यादरम्यान नाशिक-शिर्डी महामार्गावरील पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात कसा घडला? याबाबत अद्याप अस्पष्टताच असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात जखमी झालेल्या मृतांच्या वारसांना मदत पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com