राहुल गांधींची आज शेगावमध्ये जाहीर सभा, मनसे दाखवणार काळे झेंडे
Admin

राहुल गांधींची आज शेगावमध्ये जाहीर सभा, मनसे दाखवणार काळे झेंडे

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे.

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपसह मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आज महाराष्ट्रातील यात्रेचा 12 वा दिवस आहे.

सकाळी सहा वाजता अकोल्यातील कुपट बाळापूर येथून पदयात्रेला सुरूवात झाली असून, यात्रा आता बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. दरम्यान, दुपारच्या सत्रात चार वाजता शेगाव इथं गजानन महाजारांचे दर्शन घेतल्यानंतर साडेसहा वाजता राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे जेष्ठ नेते मुकुल वासनिक, भाई जगताप, नसीम खान, सुनील केदार, मिलिंद देवरा, दिपेंद्र सिंग गुड्डा यांच्याससह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

राहुल गांधी यांच्या शेगावमधील सभेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. त्यानंतर नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. पोलिसांनी मनसैनीकांना 149 ची नोटीस बजावली आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com