अर्थसंकल्पात रेल्वे बजेटमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता
Admin

अर्थसंकल्पात रेल्वे बजेटमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी 10.15 वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी 11 वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, करदात्यांना दिलासा मिळणार का, रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत कोणत्या घोषणा होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे. देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? सर्वसामान्यांच्या करात वाढ होणार की त्यांना दिलासा मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.

अर्थसंकल्पात रेल्वे बजेटमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता
आज संसदेत अर्थसंकल्प होणार सादर; काय होणार स्वस्त, काय होणार महाग?

याच पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पात रेल्वे बजेटमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी रेल्वेमध्ये आधुनिकीकरण आणि पायाभूत गुंतवणुकीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद मागील आर्थिक वर्षातील १.४ लाख कोटींवरून 20 ते 25 टक्क्यांनी वाढून १.८ लाख कोटी रुपये होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अर्थसंकल्पात रेल्वे बजेटमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता
आज संसदेत अर्थसंकल्प होणार सादर; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडणार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com