ताज्या बातम्या
Thackeray Brothers Reunion : 'एक पाऊल पुढे आलंय, आता दोन्ही हातही पुढे येतील'; चंदूमामा यांचा राज ठाकरेंच्या आईसोबत मायेचा संवाद
राज्यातील हिंदी भाषा सक्तीवरून राजकारण पेटले असून या निमित्ताने राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील हिंदी भाषा सक्तीवरून राजकारण पेटले असून या निमित्ताने राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी दोघांनीही एक पाऊल पुढे घेत येत्या 5 जुलै रोजी होणाऱ्या हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. या सर्व घटनांमध्ये राज ठाकरे यांचे मामा चंदू वैद्य यांनी समाधानाची भावना व्यक्त केली आहे. दोन्ही भावांनी एकत्र यावं, ही इच्छा अनेकदा व्यक्त करणाऱ्या चंदूमामा वैद्य यांनी आज राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही बंधूंनी एक पाऊल पुढे टाकलं आहे, आता दोघांनी एकत्र येण्यासाठी हात पुढे करावेत, असे त्यांनी म्हटले आहे.