दोन महिन्यात रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्पांचे भवितव्य होणार निश्चित

दोन महिन्यात रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्पांचे भवितव्य होणार निश्चित

राज्यातले उद्योग एका मागून एक बाहेर जात आहेत. या पार्श्वभूमीवरती देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने पुढील दोन महिने हे महत्त्वाचे असणार आहेत.

निसार शेख, रत्नागिरी

राज्यातले उद्योग एका मागून एक बाहेर जात आहेत. या पार्श्वभूमीवरती देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने पुढील दोन महिने हे महत्त्वाचे असणार आहेत. पुढील आठवड्यात सौदी अरेबियाचे राजा भारत भेटीवर येत आहेत. या वेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे राजा यांच्यामध्ये रिफायनरीबाबत चर्चा होणार का आणि झाल्यास ती सकारात्मक असणार का, याकडे निश्चितच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वेक्षण आणि माती परीक्षण थांबलेलं आहे, तर यापूर्वी नाणार येथील रिफायनरी रद्द करण्यात आलेला आहे. शिवाय मधल्या काही काळामध्ये मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती जवळपास साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प अद्यापही पुढे सरकताना दिसून येत नाही. राज्य सरकार प्रकल्पबाबत सकारात्मक आहे. कोकणात होणान्या रिफायनरीमध्ये सौदी अरेबियातील आरामको ही कंपनी यामध्ये सर्वात मोठी गुंतवणूकदार असणार आहे. आणि या सर्व घडामोडी घडत असताना सौदीचे राजा भारत भेटीवर येत आहेत. त्यामुळे या भेटीदरम्यान रिफायनरी प्रकल्पबाबत चर्चा होणार का, तसेच चर्चा झाल्यास निर्णय काय असणार, याची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. तर दुसरीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जैसे थे अवस्थेत आहे. मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये ज्या ठिकाणी प्रकल्पाचे कोणतंही काम झालेलं नाही. अशा वेळेला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जानेवारी २०२३मध्ये भारत भेटीवर येणार आहेत. दोन महिन्यात रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्पांचे भवितव्य होणार निश्चित

कोकणातील रिफायनरी आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प मोठे आणि महत्त्वाचे आहेत. रिफायनरी प्रकल्पातून आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रमध्ये होणार आहे. साधारण लाख ते दीड लाख रोजगार निामतीचा दावा केला जात आहे. पण स्थानिकांचा विरोध असल्याने या प्रकल्पाचे काम अद्यापही पुढे सरकलेलं नाही. सन | २०१६१७ मध्ये प्रकल्पाची घोषणा झाली. सन २०१९ मध्ये शिवसेना भाजप युती झाली आणि नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यानंतर बारसू आणि सोलगाव या ठिकाणी प्रकल्पाची चाचपणी करण्यात आली. पण प्रकल्पाच्या सुरुवातीला केले जाणारे माती आणि ड्रोन परीक्षण स्थानिकांनी रोखलं. त्यानंतर इथला विरोध अधिक प्रकर्षाने पुढे आला. या ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी देखील प्रकल्पाच्या विरोधात ठराव केले आहेत. काही प्रमाणात या ठिकाणी प्रकल्पाला समर्थन देखील आहे. शिवाय राज्य सरकार देखील प्रकल्पबाबत सकारात्मक आहेत. कोकणातीलच असलेले उद्योगमंत्री उदय सामंत प्रकल्प व्हावा यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करीत आहेत. अशा सर्व घडामोडी रिफायनरी आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पबाबत होत असताना यांची भारत भेट या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या ठिकाणी प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com