रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद संपला; 
देवेंद्र फडणवीस

रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद संपला; देवेंद्र फडणवीस

शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यामधील वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. अनेक टीका, गंभीर आरोप एकमेकांवर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद थंडावला होता.
Published by :
shweta walge

शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यामधील वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. अनेक टीका, गंभीर आरोप एकमेकांवर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद थंडावला होता. मात्र त्यानंतर पुन्हा बच्चू कडू यांनी रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळला आहे. यावर प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही विनंती केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद संपलेला आहे. दोघांनाही विनंती आहे की राज्याच्या हितासाठी वाद संपवून पुढे गेले पाहिजे. आमच्या लेखी हा वाद संपलेला आहे.

काय आहे बच्चू कडू व रवी राणा यांच्यामधील वाद?

किराणा वाटपावरुन बच्चू कडूंनी रवी राणांवर टीका केली होती. यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी गुवाहटीला जाऊन कोट्यवधीचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता. यानंतर बच्चू कडू चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत राणांविरूध्द तक्रार नोंदवली होती. अखेर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत दोघांमध्ये समेट घडवून आणला होता. यानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. तर बच्चू कडूंनीही वाद संपल्याचे जाहीर केले होते.

परंतु, रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडूंना डिवचले. एक लक्षात ठेवा, कुणी जर मला दम देत असेल. तर रवी राणाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दम खालला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. ते दम देऊन बोलत बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे, असा इशारा रवी राणांनी कडूंना दिला होता. यावर बच्चू कडूंनी प्रत्युत्तर देत म्हणाले, मी 5,6,7 या तारखेला माझ्या गावी कुरळपुर्णाला आहे. रवी राणा यांनी तलवार घेऊन यावे मी हातात फुल घेऊन तयार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद संपला; 
देवेंद्र फडणवीस
अडीच वर्ष सरकार होतं, पण मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा नव्हता; जयंत पाटलांची खंत
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com