Realme 15 Pro 5G : 'AI पार्टी फोन' नावानं रिअलमी 15 सिरीजचे स्मार्टफोन होणार उद्या लाँच

Realme 15 Pro 5G : 'AI पार्टी फोन' नावानं रिअलमी 15 सिरीजचे स्मार्टफोन होणार उद्या लाँच

रिअलमी 15 सिरीज उद्या, 24 जुलै रोजी भारतात आपले नवीन 15 मालिका स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

रिअलमी 15 सिरीज उद्या, 24 जुलै रोजी भारतात आपले नवीन 15 मालिका स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. AI वैशिष्ट्यांसह येणारे हे फोन डिझाइन, डिस्प्ले आणि कामगिरीत चांगले अनुभव देणारे ठरणार आहेत. या मालिकेत रिअलमी 15 5G (Realme 15 5G ) आणि रियलमी 15 प्रो 5G (Realme 15 Pro) असे दोन स्मार्टफोन्स असून "AI पार्टी फोन" या नावाने प्रचिलित केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रिअलमी 15 5G मालिका (Realme 15 5G series) उद्या, 24 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता भारतात लाँच होणारअसल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता मोबाईलप्रेमींना अत्याधुनिक फीचर्ससह नवीन मोबाईलचा अनुभव घेणे शक्य होणार आहे. या मोबाईलमध्ये AI शी संबंधित विविध वैशिष्ट्यांचा अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे. किमान दोन नवीन फोन्सचा समावेश असलेली ही मालिका 24 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. या रिअलमी 15 प्रो 5G ची किंमत भारतात 39,999 रुपये असू शकते. परंतु खरेदीसाठी ही किंमत सुमारे 35 हजार रुपये इतकी कमी असण्याची शक्यता आहे. हे दोन्ही फोन लॉंचिंगनंतर इंडिया स्टोअर आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत.

डिझाइन

रिअलमी 15 5G फ्लोइंग सिल्व्हर, सिल्क पिंक आणि वेल्वेट ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे, तर प्रो मॉडेल फ्लोइंग सिल्व्हर, सिल्क पर्पल आणि वेल्वेट ग्रीन रंगांमध्ये येईल. दोन्ही फोनची जाडी अनुक्रमे 7.66 मिमी आणि 7.69 मिमी आहे. मागील बाजूस तीन कॅमेरा लेन्स असतील, ज्यापैकी दोन उभ्या रांगेत आणि एक बाजूला असेल. स्टँडर्ड मॉडेलमधील तिसरी लेन्स केवळ सौंदर्याच्या दृष्टिकोनातून आहे. दोन्ही फोन IP69-रेटेड बिल्डसह येणार आहेत, जे पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे.

डिस्प्ले

दोन्ही मॉडेल्स 6.8-इंच AMOLED स्क्रीनसह येतील, ज्यामध्ये 4D कर्व्ह+ 'हायपरग्लो' डिस्प्ले, 140Hz रिफ्रेश रेट आणि 94 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो असेल. डिस्प्ले 2,500Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 6,500 निट्स पीक ब्राइटनेस प्रदान करेल. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असेल.

कॅमेरा

रिअलमी 15 5G मध्ये 50-मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल, तर प्रो मॉडेलमध्ये Sony IMX896 सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा असेल, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) असेल. दोन्ही फोन 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतील.

बॅटरी

दोन्ही फोन 7,000mAh बॅटरीसह 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतील. स्टँडर्ड मॉडेल 83 तास आणि प्रो मॉडेल 113 तास संगीत प्लेबॅक ऐकायला मिळणार आहे.

हे लाँचिंग त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलला पाहायला मिळणार आहे. रिअलमीची पुढील जनरल क्रमांकाची मालिका- Realme 15 आणि Realme 15 Pro भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे.

हेही वाचा

Realme 15 Pro 5G : 'AI पार्टी फोन' नावानं रिअलमी 15 सिरीजचे स्मार्टफोन होणार उद्या लाँच
ATS Arrest Terrorist : अल-कायदाशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com