जालन्यातील घटनेवर रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा

जालन्यातील घटनेवर रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा

धुळ्यात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जालना येथील घटनेवरून चांगला निशाणा साधला आहे.
Published by :
shweta walge
Published on

धुळ्यात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जालना येथील घटनेवरून चांगला निशाणा साधला आहे. जालना लाठीचार्ज प्रकरणात राज्य सरकारने माफी मागावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी धुळ्यात पत्रकारांशी बोलताना केली आहे, त्याचबरोबर आधी लाठीचार्ज झाला मगच दगडफेक झाली असल्याचे देखील स्पष्ट करीत आमदार रोहित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणाचातरी फोन आल्यानंतर आंदोलनकर्त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप देखील राज्य सरकारवर लावला आहे,

इलेक्शन कमिशन ही भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या हाताची बाहुली झालं असल्याचा आरोप देखील यावेळी आमदार रोहित पवार यांनी लावला आहे,

भाजपाचा अहंकार आमच्यातून गेलेल्या काहींना चिपकला असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याकडेच राहील अशी भाषा त्यांच्याकडून केली जात असल्याचा आरोप यावेळी आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर लावला आहे,

वन नेशन वन इलेक्शन ला विरोध केला पाहिजे असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे, तर भाजपतर्फे संविधान बदलण्याचा प्रयत्न करून हेकेखोरशाही आणायची आहे, त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना राबविण्याचा अट्टहास भाजपतर्फे करण्यात येत असल्याचा देखील आरोप यावेळी आमदार रोहित पवार यांनी भाजपवर लावला आहे,

राज्यामध्ये जेव्हा जेव्हा अनुचित घटना घडल्या तेव्हा तेव्हा त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, आणि यामुळेच जालना येथील घटनेस गृह विभाग जबाबदार असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे,

जालन्यातील घटनेवर रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा
'…तर पाणी सुटलं म्हणून समजा' सरकारच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com