शरद पवारांच्या दाखल्यावर ओबीसी नोंद? रोहित पवार म्हणाले 'सत्य पचत नाही...'

शरद पवारांच्या दाखल्यावर ओबीसी नोंद? रोहित पवार म्हणाले 'सत्य पचत नाही...'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा एक दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा एक दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या दाखल्यात शरद पवारांचा प्रवर्ग हा ओबीसी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावरआमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, “खोटे प्रमाणपत्र आहे. राजकीय विरोधक त्यात बदल करून व्हायरल करत आहेत. महाराष्ट्रात वेगळी प्रथा चालू करत आहात. सत्य गोष्ट कधीही बदलू शकत नाही. भाजपचे सोशल मिडियाचे कार्यकर्ते यांना सत्य पचत नाही. सत्याचे विचार भाजपला कधीही पटत नाही” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

शरद पवारांच्या दाखल्यावर ओबीसी नोंद? रोहित पवार म्हणाले 'सत्य पचत नाही...'
मुंबई, पुण्यासह पाच बाजार समित्यांची झाडाझडती, सरकारचा निर्णय

दरम्यान, शरद पवार यांच्या ओबीसी दाखल्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी आरोपांना उत्तर दिले. कोणीही त्या कंपनीचे नाव पाहिलेले नाही. शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते, त्यावेळेस इंग्रजी मधून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. हे सगळे हास्यास्पद चालू आहे. हा सगळा बालिशपणा सुरू आहे. खोटी प्रमाणपत्र हे मार्केटमध्ये खूप मोठे झाले आहे, असा टोलाही सुळे यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com