पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक का केलं? शिवसेनेच्या सामनातून सांगितला संजय राऊतांनी अर्थ

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक का केलं? शिवसेनेच्या सामनातून सांगितला संजय राऊतांनी अर्थ

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं.

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली म्हणजे जी काही शाब्बासकी दिली ती कशासाठी? तर ”शाब्बास! जे काम औरंगजेब, अफझल खानास जमले नाही, ते शिवसेना फोडण्याचे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केलेत. शाब्बास रे माझ्या गब्रू!” शाब्बासकी असेल ती यासाठीच, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

तसेच “पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी नागपूर-शिर्डी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. सोहळा उत्तमच झाला. पंतप्रधान मोदी यांनी देशाची लूट करणाऱ्यांवर व भ्रष्ट मार्गाने राज्य करणाऱ्यांवर एका तळमळीने आसूड ओढले, पण हे शब्दांचे आसूड ओढताना त्यांनी आपल्या डाव्या-उजव्या बाजूला कटाक्ष फेकला असता तर देशाची लूट करणारे, भ्रष्ट मार्गाने राज्य करणारे कोण हे लक्षात आले असते. पंतप्रधानांच्या व्यासपीठावरच एक घटनाबाह्य सरकार बसले होते व ‘खोके’ सरकार म्हणून ते बदनाम आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी कितीही तळमळीने भावना व्यक्त केल्या तरी ते एकटे कोठे पुरे पडणार?”,अशी जोरदार टीका सामनातून करण्यात आली आहे.

यासोबतच “शाब्बास, शाब्बास, मुख्यमंत्री शाब्बास! मुंबईतील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून त्यांच्या ‘निर्भया’ योजनेतील पोलीस वाहने खोकेबाज बेइमान आमदारांच्या सुरक्षेसाठी लावल्याबद्दल तर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना जवळ खेचून शाब्बासकी दिली नसेल ना? महिलांना सुरक्षा नाही व गद्दार आमदारांच्या मागे-पुढे पोलिसी लवाजमा. यालाच म्हणतात- ”आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या!” आपल्या देशाची अर्थव्यवस्था याच पायावर उभी आहे” व “कर्नाटकचे मुख्यमंत्री रोजच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. त्या अपमानावर केंद्राकडे आवाज उठविण्याची हिंमत न दाखवल्यामुळेच पंतप्रधानांनी नागपूरच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारलेली दिसते”असे सामनातून म्हटले गेले आहे.

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक का केलं? शिवसेनेच्या सामनातून सांगितला संजय राऊतांनी अर्थ
राज्यपालांविरोधात आज पुणे बंदची हाक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com