sanjay raut
sanjay raut

बाळासाहेबांच्या अनेक गोष्टी मला माहित पण...; संजय राऊत

राऊतांनी जोरदार हल्लाबोल करत काही खुलासे केले आहेत.
Published by :
shweta walge
Published on

लोकशाही मराठीने खासदार संजय राऊत यांच्यासोबत एक्सक्लुझिव बातचित केली आहे. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यावर उत्तर देत राऊतांनी जोरदार हल्लाबोल करत काही खुलासे केले आहेत.

काल [5 जून2023] झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, ज्या दिवशी मी पुस्तक लिहायचं ठरवेल त्या दिवशी महाराष्ट्रात हाहाकार माजेल. यावर प्रश्न विचाराला असता संजय राऊत म्हणाले की,

मीही पुस्तक लिहू शकतो पण तुम्ही कोणत्या थराला जाणार. राजकारणामध्ये जेव्हा काही गोष्टी घडवताना आपल्या सहकाऱ्यानां विश्वासात घेतलं जातं, त्या गोष्टी तुम्ही फोडणार त्याला काय नैतिकता म्हणणार. मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर 40वर्ष काम केलं. मगं मी पुस्तक लिहू का?

तसेच ते पुढे म्हणाले की, अनेक जण म्हणातात मला लिहा पण मी नाही म्हटलं. मी पाहीलं, ऐकलं, मी जे अनुभलं त्यांच्या बरोबर तो नेता जेव्हा या जगात नाही आहे त्या संदर्भात काही खुलासे केले तर ते माझ्या बरोबरच नष्ट होईल. मी हा नालायकपणा कधी करणार नाही. माझ्याकडे खुप माहिती आहे पण हा नालायकपणा मी कधीच करणार नाही. माझ्याकडे सुध्दा राजकारणातल्या गुप्त माहिती आहेत. त्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत.

पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंसोबत मी काम करतो. ते काय पुस्तक लिहिण्यासाठी? असं संजय राऊत म्हणाले.

sanjay raut
ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव : सूत्र
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com