“…तर त्याचा सगळ्यात मोठा फटका फडणवीसांना बसू शकतो - संजय राऊत

“…तर त्याचा सगळ्यात मोठा फटका फडणवीसांना बसू शकतो - संजय राऊत

पुण्यातील कसबा आणि पिंपरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पुण्यातील कसबा आणि पिंपरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावरुन खासदार संजय राऊत म्हणाले की, “या सरकारचा नक्की डाव तरी काय आहे. मोठं षडयंत्र रचलं जातंय का? विरोधी पक्षांच्या आमदार, नेत्यांवर भविष्यात जीवघेणे हल्ले व्हावेत आणि त्यातून दहशत निर्माण व्हावी असा काही कट आहे का? कारण चित्र तसंच दिसतंय. त्यांच्या पक्षात जाणारे काही लोक, त्यांच्या मागेपुढे पोलीस, सुरक्षारक्षकांचा लवाजमा आहे. त्यांना गरज नाही. पण ज्यांना खरंच सुरक्षेची गरज आहे, त्यांच्याविषयी ढिलाईनं काम केलं जातंय. गृहमंत्र्यांनी वेळीच पावलं उचलली नाहीत, तर त्याचा सगळ्यात मोठा फटका त्यांना बसू शकतो. असे राऊत म्हणाले.

यासोबतच लोकांचे लोंढेच्या लोंढे आमच्या कार्यक्रमांना येत आहेत. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद दौऱ्यातही प्रचंड गर्दी उसळते आहे. हे पाहिल्यामुळे कदाचित त्यांच्या पोटात गोळा आला. या मार्गाने सत्तेचा गैरवापर जमला नाही. मग अशा प्रकारे हल्ले आणि रक्तपात करून तरी हे थांबवता येईल का, यासाठी हे सगळं सुरू आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला आधीचा कार्यकाळ आठवावा. विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी दहशतीखाली आहेत. कारण सगळ्यांची सुरक्षाव्यवस्था गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढून घेतली आहे. असेही राऊत म्हणाले. असे राऊत म्हणाले आहेत.

“…तर त्याचा सगळ्यात मोठा फटका फडणवीसांना बसू शकतो - संजय राऊत
थोरात वाद चिघळू नये, टपून बसलेल्या भाजपाच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये; सामनातून टीका
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com