नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म देणं हे हिराबेन यांचं मोठं योगदान - संजय राऊत
Admin

नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म देणं हे हिराबेन यांचं मोठं योगदान - संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या आई हिराबेन मोदी ( Heeraben Modi ) यांचं निधन झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या आई हिराबेन मोदी ( Heeraben Modi ) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती ट्विट करत दिली आहे.

त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनीही हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “जेव्हा कोणतीही मोठी व्यक्ती आपल्या आईला गमावते तेव्हा अनाथ होते. मग तो श्रीमंत असो, उद्योगपती असो, शक्तिशाली असो…आईचं छत्र हरवलं की तो अनाथ होतो. त्यामुळेच मोदी कुटुंबावर जो कठीण प्रसंग आला आहे त्यावेळी संपूर्ण शिवसेना, ठाकरे कुटुंब, जनता त्यांच्या पाठीशी आहे,” असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म देणं हे हिराबेन यांचं मोठं योगदान - संजय राऊत
पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी - राहुल गांधी

तसेच नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं जीवन संघर्षमय होतं. त्यांनी अशा मुलाला जन्म दिला ज्याने आपल्या पक्षासाठी नेहमी संघर्ष केला, कष्ट केले. तेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. अशा मुलाला जन्म देऊन हिराबेन मोदी यांनी समाज आणि देशासाठी मोठं योगदान दिलं. “हिराबेन मोदी यांचं निधन झालं असून शिवसेना, ठाकरे कुटुंब, देशवासी सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहेत. या संकटसमयी आम्ही त्यांच्यासह आहोत. असे म्हणत राऊत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला जन्म देणं हे हिराबेन यांचं मोठं योगदान - संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी अनंतात विलीन; मोदींनी दिला पार्थिवाला खांदा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com