आज राज्यात क्रांतिकारी घोषणा होईल - संजय राऊत

आज राज्यात क्रांतिकारी घोषणा होईल - संजय राऊत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. या युतीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीनं आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. हाच मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. आज दुपारी 1 वाजता यासंबंधित एक पत्रकार परिषद होणार आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, बाळासाहेबांनी अनेक लढाया केल्या. कितीही राजकारण झाले तरी बाळासाहेब ह्दयात अजरामर आहेत. बाळासाहेबांनी 55 वर्ष संघर्ष केला. असे राऊत म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, आज राज्यात क्रांतिकारी घोषणा होईल. आज शिवशक्ती आणि भिमशक्ती युतीची घोषणा होणार आहे. ही 2 विचारांची युती असेल. या दोन शक्ती एकत्र याव्या हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. असे राऊत म्हणाले.

आज राज्यात क्रांतिकारी घोषणा होईल - संजय राऊत
बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचितच्या युतीची आज घोषणा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com