राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले...

राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरे अमित शाहांची भेट घेणार आहेत. अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे आपली भुमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, मला माहित नाही. मी त्यांच्यावरीत बोलू इच्छित नाही. दिल्लीत जाणं किंवा अन्य कुठं जाणं हा त्यांचा अधिकार आहे. मला असं कळलं की रात्री त्या नेत्यांना भेट मिळाली नाही सकाळी बोलावलं. त्यावर काही मत व्यक्त करावं अशी माझी भूमिका नाही. असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले...
मनसे महायुतीत सामील होणार? संदिप देशपांडे म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com