संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

मागील अनेक महिन्यांपासून संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते.
Published by :
Siddhi Naringrekar

मागील अनेक महिन्यांपासून संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. कोर्टाकडून अनेक वेळा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. मात्र, आता राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. त्यानंतर ईडीने कोर्टाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, या जामिनाला ईडीचा (ED) विरोध कायम आहे. या विरोधात ईडीने उच्च न्यायालयात अपिल केलं आहे. त्यावर न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 

राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. त्यांच्या कुटुंबीयांशिवाय त्यांना कुणालाही भेटू दिले जात नव्हते. मध्यंतरीच्या काळात राऊत यांच्या वतीने जामिनासाठी कोर्टात वारंवार अर्जही करण्यात आले. पण त्यांना जामीन मंजूर झाला नव्हता. मात्र आता जामीन मंजूर झाला आहे. 70 पानांच्या या निकालामध्ये संजय राऊत यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याने त्यांना जामीन मंजूर करत असल्याचे न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीना विरोधात ईडीने देशपांडे यांच्या समोर त्यांना जामीन देऊ नये यासाठी युक्तिवाद केला यावर नाराजी व्यक्त करीत ईडीच्या या प्रकाराची मी नोंद करून घेत आहे, अशा शब्दात देशपांडे यांनी ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भात जामीन रद्द व्हावा म्हणून ईडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

तब्बल 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com