मोठी बातमी! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून फरार; पोलीस दलात खळबळ

मोठी बातमी! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून फरार; पोलीस दलात खळबळ

पुण्याच्या ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॅार्ड क्रमांक 16 मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेला होता. यानंतर ससून रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Published by :
shweta walge

पुण्याच्या ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॅार्ड क्रमांक 16 मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेला होता. यानंतर ससून रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेत राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार रवींद्र धनगेकर यांनी केला होता. यातच आणखी एक आरोपी ससून रुग्णालयातून पलायन करण्यास यशस्वी ठरला आहे. काही दिवसांपुर्वी हत्या झालेला कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मार्शल लुईस लीलाकर (Marshal Lilakar) असे फरार आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी लीलाकरला पुणे पोलिसांंनी अटक केली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ याला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केली होती. ससून रूग्णालयातून पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली. सोशल मिडीयावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्या प्रकरणी लीलाकारला अटक करण्यात आली होती.

आज पहाटेच्या सुमारास लीलाकरने पोटात दुखत असल्याचा बाहाणा केला. त्यामुळे  येरवडा जेलमधून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून फरार; पोलीस दलात खळबळ
Central Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या एलटीटी स्थानकात 7 दिवसांचा ब्लॅाक, वेळापत्रकात बदल

फरार असलेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 8 पथके पाठवली असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहे. मात्र या प्रकरणानंतर पुणे पोलिसांवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com